Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज सायन्स अकॅडमीचे बारावी सीईटी परीक्षेत उत्तुंग यश



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज सायन्स अकॅडमीचे विद्यार्थी बारावी एम.एच.टी.सीईटी परीक्षेत शिवम संजय चौगुले (९६.९७), सृष्टी चंद्रकांत कोरी (९३.९९), अथर्व संतोष पाटील (९१.४३), प्रेमकुमार संतोष कुरळे (८८.७०), वनिता विठ्ठल जाधव (८६.२६), सौरभ संजयकुमार बागडी (८६.२०) या विद्यार्थ्यांनी धवल यश संपादन केले. या सर्व यशस्वीतांचे अकॅडमीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.




सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, संचालिका प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांचे प्रोत्साहन तर सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अकॅडमीच्या माध्यमातून एम.एच.टी.सीईटी परीक्षेसाठी स्वतंत्रपणे क्रॅश कोर्स व विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कसून अभ्यास करून घेण्यात येत आहे. त्यामुळे शिवराज सायन्स अकॅडमीचे विद्यार्थी सीईटी परीक्षेत चमकत असल्याचे स्पष्ट करून सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच चालू शैक्षणिक वर्षामध्ये देखील शिवराज सायन्स अकॅडमीमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी केले. यावेळी अकॅडमीचे समन्वयक सचिन काटे, ग्रंथपाल संदीप कुराडे, प्रा. विक्रम शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.