Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूरच्या न्यू वूमन्स फार्मसीमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा



कोल्हापूर : येथील न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून औषधी वनस्पती व इतर रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले व ते जतन करण्याची शपथ घेण्यात आली.



दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान, नैसर्गिक चक्रातील बदल यांविषयी जनजागृतीची गरज असून आपणही निसर्गाचे काही तरी देणे लागतो या संकल्पनेतून सदरचा उपक्रम राबविण्यात आला.



या उपक्रमासाठी प्रा. पियुषा नेजदार, प्रा. दिव्या शिर्के, प्रा. वैष्णवी निवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदरचा उपक्रम कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.