कागल : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी कागल येथे शिवसेनेची ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) बैठक पार पडली. जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत कागल तालुक्यातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी कर्ण संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाप्रमुख प्रा. शिंत्रे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख दिनकर जाधव, दिनानाथ चौगुले, उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, शिवगोंड पाटील, कागल तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, तालुका संघटक मारुती पुरीबुवा, उपतालुकाप्रमुख युवराज येजरे, दिनकर लगारे, नागेश हसबे ,विभाग प्रमुख दिग्विजय पाटील, अशोक पाटील, राजेंद्र साबळे, विजय भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

