जिल्हाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आज इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सर्वसामान्य जनतेस स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची सक्ती करू नये या मागणीचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, काँग्रेसचे सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, प्रताप होगाडे, विक्रांत पाटील, अमरीश घाटगे, जावेद मोमीन, चंद्रकांत पाटील, राजू सूर्यवंशी, बाबासो देवकर यांच्यासह इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


