Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव पुलावर एक फूट पाणी ; वाहतूक बंद

                                  छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर दुपारी बाराच्या दरम्यान एक फुट पाणी आल्याने खबरदारी म्हणून पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक पुन्हा थांबली आहे. भडगाव पुलावर दुसऱ्यांदा पाणी आले आहे. पुराच्या पाण्याच्या परिस्थितीकडे भडगाव येथील तलाठी  सौ. रुपाली कांबळे, पोलीस पाटील उदय पुजारी, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक लक्ष ठेवून आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.