Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणजे शिक्षण क्षेत्रातील ज्ञानज्योती!

बिल्वाश्रम मठाचे श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे प्रतिपादन 


हरळी बुद्रुक येथे सिंबायोसिस स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ






गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजच्या काळात इतरांचा विचार न करता फक्त  स्वतःचा विचार करून जीवन जगणारी बरेच लोक आहेत, पण इतरांचा विचार करून दुसऱ्यांसाठी काहीतरी करावे या प्रवृत्तीने मुजुमदार कुटुंबीयांनी शैक्षणिक क्षेत्रातील चालवलेली चळवळ पाहता खरोखरच उल्लेखनीय आहे. डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील ज्ञानज्योती असून त्यांच्या ज्ञानज्योतीचा प्रकाश केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पसरत चालला आहे. असे प्रतिपादन बिल्वाश्रम मठाचे महांत श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केले.



सिंबायोसिस स्कूल हरळी बु।। (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित गुरुपौर्णिमा व गुणवंत विद्यार्थी सत्कार या संयुक्त समारंभात बोलत होते. ते पुढे म्हणाले,  विद्यार्थ्यांनो डॉ. मुजुमदार, दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम अशा अनेक महान लोकांनी आयुष्यात अनेक अडथळे आणि संघर्ष पार करून उज्वल यश मिळवलेले आहे. आज अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील उच्च पदावर भारतीयच विराजमान आहेत. ही कर्तुत्वान माणसे खेड्यातील साध्या शाळेत शिकूनच मोठी झाले आहेत. त्यामुळे तुम्हीही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जीवनात मिळवलेले अतुलनीय यश हीच तुमच्या शिक्षकांसाठी किंवा गुरूंसाठी गुरुदक्षिणा आहे. 



यावेळी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला यांनी केले. त्यानंतर सिंबायोसिस व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. सतीश घाळी यांच्याहस्ते  बिल्वाश्रम मठ गडहिंग्लजचे महांत श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शालांत परीक्षेत यश मिळालेल्या श्रेया पाटील, अक्षरा घेवडे, समीक्षा साटपे, सुजल कुंभार, सलोनी पाटील, समृद्धी बामणे आदित्य कांबळे, नम्रता कांबळे या विद्यार्थ्यांसह सारथी शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या व एनएमएमएस  परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या भक्ती पाटील, स्वरित पाटील साहिल वाघराळकर , संचित पाटील , सिद्धार्थ खवरे , रत्नराज पाटील, वेद पाटील, अष्टमी होडगे ,वैष्णवी पताडे, वेदिका रेडेकर या विद्यार्थ्यांचा  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.



या कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी गडहिंग्लज तालुका मराठी अध्यापक समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अशोक पाटील आणि मार्गदर्शक पदी निवड झाल्याबद्दल रावसाहेब मुरगी यांचा तर एनएमएमएस साठी मार्गदर्शन केल्याबद्दल वर्गशिक्षिका कविता कागीणकर आणि इयत्ता दहावी साठी विशेष मार्गदर्शन केल्याबद्दल अनुपमा देसाई या शिक्षकांचा महास्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सिंबायोसिस शाळा समितीचे निमंत्रित सदस्य शिवराम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणातून सिंबायोसिस व्यवस्थापन समिती सदस्य डॉ सतीश घाळी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि शिक्षण क्षेत्रातील सिंबायोसिसचे असणारे वेगळेपण सांगितले. सूत्रसंचालन रावसाहेब मुरगी  यांनी केले तर वर्गशिक्षक संतोष आंबी यांनी  आभार मानले.



याप्रसंगी अरुण हरळीकर, माजी सरपंच बळवंत गुरव, पोलिस पाटील रेणुका परीट, रामचंद्र होडगे, राजाराम पाटील, संजय पाटील, अशोक गुरव, विद्या खवरे, छाया खवरे, कावेरी खवरे, शोभा कांबळे, राजेंद्र शेलार, अतुल अहिरे, दिगंबर पाटील, दत्ता गोंधळी, यल्लापा कोळी, इंद्रजित पाटील, विनायक पाटील यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.