Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त भडगावात मतदार जनजागृती


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
भडगाव येथील शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदार जनजागृती करण्यात आली. सदर उपक्रम हा शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी राबविला.




यावेळी अठरा वर्ष पूर्ण झालेल्या तरुण, तरुणी यांच्यासह ग्रामस्थांनी  मतदार नोंदणी, तसेच आपले नाव मतदार यादीमध्ये आहे कि नाही याची खात्री, नावात, मधले नाव, आडनाव, वय वर्ष, प्रभाग, पत्ता बरोबर असल्याची खात्री करून घेण्यासाठी शिवसेना बोर्डासमोर सहा वार्डातील ठेवण्यात आलेल्या मतदार याद्या पाहण्याकरता ग्रामस्थांनी गर्दी केली होती.



नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बऱ्याच मतदारांचे  ओळखपत्र असून देखील मतदार यादीमध्ये नाव नसल्याने मतदानापासून वंचित राहिले होते. येत्या विधानसभा निवडणुकी दरम्यान पुन्हा. अशी चूक होऊ नये व मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आज ही मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आल्याचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी सांगितले.



यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख वसंत नाईक, युवासेना उपतालुका प्रमुख विशाल चव्हाण, गणपती वंटमुरे, रावसाहेब मुकणनावर, सुरेश तोडकर, शंकर हिरेकुडे, विनायक तोडकर, रमेश गोते, दयानंद नाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.