तातडीने खड्डे न मुजविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
कागल : कागल एसटी आगार परिसरात पडलेले खड्डे तातडीने मुजवावेत या मागणीसाठी ठाकरे पक्ष शिवसेनेच्या वतीने एसटी आगार परिसरात निदर्शने करण्यात आली. सदर आंदोलन उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
कागल एसटी आगार परिसरात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून याचा त्रास आगारात येणाऱ्या, जाणाऱ्या सर्व नागरिकांना होत आहे. कागल नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे खड्डे तातडीने मुजवावेत अशी मागणी यावेळी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
यावेळी उपजिल्हा उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे, तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, वाहतूक सेना शहर प्रमुख महाळूकरीकट्टी, शहर प्रमुख अजित मोडेकर, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष नितीश डावरे, बाळासाहेब पाटील, वैभव मोडेकर व शिवसैनिक उपस्थित होते.


