Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीत अनिकेत हळींगळे यांचा श्री बिरेश्वर सोसायटीतर्फे सत्कार

तीन शासकीय पदांना एकाच वेळी गवसणी घातल्याबद्दल सन्मान 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील अनिकेत अनिल हळींगळे यांनी अन्न व नागरी पुरवठा निरीक्षक (फूड इन्स्पेकटर), तलाठी , पोलिस महासंचालक कार्यालय वरिष्ठ लिपिक अशा तीन शासकीय पदांना एकाच वेळी गवसणी घालत यश मिळविले त्याबद्दल श्री बिरेश्वर को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तर्फे विजय लोहार व गजनान हळींगळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल हळींगळे होते.



यावेळी अनिकेत हळींगळे यांनी आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल माहिती देताना अभियांत्रिकी शिक्षण (बी.ई.) ते एम.पी.एस.सी स्पर्धा परीक्षेपर्यंतचा प्रवास सांगितला.



यावेळी युवा उद्योजक शिवकुमार संसुद्धी, अनिल हळींगळे यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास सुहास कुंभार, महांतेश मुंगुरवाडी, इम्रान पाणारी, शिवाजी कुराडे, सतिश गोटुरे, आनंद मठपती, सतिश केसरकर, रवींद्र पाटोळे, अविनाश मुंडाशी, अजित स्वामी, रोहिणी नावलगी, सतिश येणेचवंडी, अविनाश रवेदार उपस्थित होते. स्वागत शाखाधिकारी बाहुबली पाटील यांनी केले. आभार राम मठपती यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.