Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव पूल सलग तिसऱ्या दिवशीही पाण्याखालीच ; पुलावर तीन फूट पाणी

हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ 


पुलावरील वाहतूक बंदच; इतर बंधार्‍यांवरही पाणी कायम 



                                  छायाचित्र  : वसंत नाईक, भडगाव 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर पुराच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून सलग तिसऱ्या दिवशी पूल पाण्याखालीच आहे. पुलावर आता तब्बल तीन फूट पाणी आले आहे. त्यामुळे गडहिंग्लज- चंदगड मार्गावरील वाहतूक अजून देखील ठप्पच आहे.




मंगळवारी दुपारी भडगाव पुलावर पुराचे पाणी आले आहे. आज गुरुवार सलग तिसऱ्या दिवशी देखील पुलावर पाणी कायम असून पाण्याची पातळी तीन फुटापर्यंत आहे. संततधार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पोलीस, महसूल प्रशासन यंत्रणा, भडगाव आपत्ती व्यवस्थापनची टीम पूरस्थितीवर रात्रंदिवस लक्ष ठेवून आहे. भडगाव पुलावर पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांना पुराच्या पाण्यात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जरळी, निलजी, नांगनूर, ऐनापुर, इंचनाळ बंधारे देखील पाण्याखालीच आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह, विविध आस्थापनात काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला पर्यायी मार्गाने मोठी कसरत करून गडहिंग्लजला यावे लागत आहे. 



भडगाव पुलावर पाणी आल्यापासून येथील पोलीस पाटील उदय पुजारी, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, पाणीपुरवठा कर्मचारी बाळासाहेब कांबळे, तलाठी सौ रुपाली कांबळे, ग्रामसेवक राजेंद्र गवळी, पोलीस कॉन्स्टेबल विजय बंदी पुराच्या पाण्यावर लक्ष ठेवून आहेत.


 व्हिडिओ येथे पहा  👇👇




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.