Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव पुलावर तीन फूट पुराचे पाणी, गडहिंग्लजच्या नदीवेस परिसरात पाणी वाढू लागले

पर्यायी गजरगाव बंधारा मार्ग देखील बंद होण्याची शक्यता  


भडगाव स्मशान शेडमध्ये पुराचे पाणी शिरले 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव पुलावर पुराचे पाणी झपाट्याने वाढले असून पुलावर तीन फूट पाणी आहे. आता हळूहळू पूर्ण पूल पाण्याखाली जात आहे. गडहिंग्लजमधील नदीवेस परिसरात देखील पाणी वाढले असून स्मशानभूमीच्या पुढे पाणी गेले आहे. त्यामुळे आता पूरस्थिती हळूहळू गंभीर होताना दिसत आहे. दरम्यान, पर्यायी मार्ग असणाऱ्या गजरगाव बंधाऱ्यावर देखील पाणी येत असून हा मार्ग देखील लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गडहिंग्लजचा संपर्क पूर्णता तुटणार आहे. या परिस्थितीकडे पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनची टीम लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून सर्व सज्जता ठेवण्यात आलेली आहे.


गजरगाव : येथील गजरगाव बंधाऱ्यावर देखील पाणी यायला सुरुवात झाल्याने हा मार्ग देखील बंद होण्याची शक्यता आहे.



भडगाव स्मशान शेडमध्ये पाणी शिरले, लोकवस्तीनजीक पाणी येऊ लागले 




भडगाव गावाजवळील लोक वस्तीनजीक देखील पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. नदीवेस भागातील  स्मशान शेडमध्ये देखील पाणी शिरले आहे. पोलीस पाटील उदय पुजारी, रवींद्र शेंडुरे, बाळासाहेब कोडोळी, रवींद्र बंदी, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक  यांनी भडगाव येथील नदीवेस भागातील पूरस्थितीची पाहणी करून नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. 




पुराच्या पाण्यातून जात जॅकवेलचा विद्युत पुरवठा केला खंडित 



भडगाव गावाला पाणीपुरवठा करणारे जॅकवेल देखील पुरामुळे  पाण्याखाली गेले आहे. या जॅकवेलचा विद्युत पुरवठा सुरू होता. दक्षता म्हणून वरिष्ठ तंत्रज्ञ एम.डी किल्लेदार, विद्युत सहाय्यक पी. एम.भिसे, एन. के. माळी यांनी पुराच्या पाण्यातून जात जॅकवेलला दिलेला विद्युत पुरवठा खंडित केला. त्यांना ग्रामपंचायत कर्मचारी दयानंद पताडे, अशोक केसरकर, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक यांनी मदत केले. 



दरम्यान, भडगाव येथील श्री कल्लेश्वर सोसायटीचे रेशन धान्य दुकान सुरळीतपणे सुरू आहे. त्या ठिकाणी ग्रामस्थांना शिधापत्रिकेवरील रेशन देणे सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.