डॉ. ए.डी. शिंदे इंजीनियरिंग कॉलेजमध्ये केंद्र
पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
![]() |
| भडगाव : येथील डॉ. ए.डी. शिंदे इंजीनियरिंग कॉलेजमध्ये सुरू केलेल्या कृषी सहायता केंद्रात शेतकऱ्यांना मोफत पीक विमा परत देताना कृषी सहाय्यक अनिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांसाठी केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2024 - 25 खरीप हंगामसाठी पिक विमा भरण्यासाठी डॉ. ए.डी. शिंदे इंजीनियरिंग कॉलेज भडगाव येथे कृषी सहायता केंद्रामार्फत मोफत पिक विमा भरून दिला जात आहे, अशी माहिती कृषी सहाय्यक अनिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक यांनी दिली.
पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, सुलभ पद्धतीने नोंदणी व्हावे म्हणून भडगाव येथील डॉ. ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कृषी सहायता केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात कृषी सहाय्यक अनिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक शेतकऱ्यांना पिक विमा संदर्भात मार्गदर्शन करून विमा भरून देत आहेत. 31 जुलै पर्यंत पिक विमा भरण्याची अंतिम मुदत आहे. या केंद्रात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पिक विमा शेतकऱ्यांना भरून दिला जात आहे. शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पिक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे -
1. सातबारा उतारा, आठ अ उतारा
2. बँक पासबुकची झेरॉक्स
3. आधार कार्ड झेरॉक्स
4. पीकपेरा घोषणापत्र
अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा -
श्री. चंद्रकांत कोडोळी
मो.9503135305
सौ.पल्लवी कोकीतकर
मो.9145654277
श्री.अनिल कांबळे कृषी सहाय्यक
मो.9423984841




