Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ. प्रसन्न चौगुले उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : येथे डॉ. प्रसन्न चौगुले यांचा पुरस्कार देऊन सत्कार करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ, शेजारी डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ. दिलीप माने यांच्यासह अन्य.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न चौगुले यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉक्टर्स डे च्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रात योगदान व रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून आरोग्य सेवा केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.





त्यांनी महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण उद्दिष्ट पूर्ती, प्रसूती, लहान मुलांचे लसीकरण आदी उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यासह रुग्णांना चांगली सेवा दिल्याबद्दल हा गौरव केला. डॉ. प्रसन्न चौगुले हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी गावचे आहेत. यावेळी डॉ. दिलीप माने, डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ. योगेश साळे, डॉ. प्रशांत कोरे, डॉ. योगेश गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.