अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळ व महाविद्यालयांना दिनांक 26 व 27 जुलै रोजी दिवस सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
पुढील दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंचगंगेने धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रम शाळा, सर्व महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण संस्था यांच्या आस्थापनावरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 26 व 27 जुलै अशी दोन दिवसांची सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावे असे देखील आदेशात म्हटले आहे.

