पुलाखाली दीड फुटावर पाणी, पाणीपातळीत झपाट्याने वाढ
पावसाचा जोर कायम राहिल्यास पुलावर पाणी येण्याची शक्यता
निलजी बंधारा पाण्याखाली, वाहतूक बंद
जरळी बंधाऱ्यावरही पाणी पातळी वाढू लागली
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून पाणी भडगाव पुलाला येऊन धडकत आहे. पाऊस सुरू असल्याने सकाळपासून साडेतीन फुट उंच पाण्याची पातळी वाढली आहे. आता पुलाच्या खालच्या बाजूला पाणी धडकत आहे. पुलावर पाणी येण्यास अजून दीड फूट पाणी कमी आहे.
व्हिडिओ येथे पहा 👇👇
पावसाचा जोर कायम राहिल्यास पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे. हिरण्यकेशे नदीवरील निलजी बंधारा पाण्याखाली गेला असून जरळी बंधार्यावरही पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे.
![]() |
| निलजी : येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. |
![]() |
| जरळी : येथील बंधाऱ्यावरही पाण्याची पातळी वाढत आहे. |




.jpg)