शिक्षणाधिकारी सौ.मीना शेंडकर यांचे गडहिंग्लज येथे गौरवोद्गार
गडहिंग्लजला शिक्षणमंचच्या वतीने गुणगौरव सोहळा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शाळा हिच माझी पंढरी आणि विद्यार्थी हाच माझा पांडूरंग आहे असे सांगून आषाढी एकादशीच्या दिवशी शिक्षणमंच गुणगौरव सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांचे कौतुक करताना साक्षात पांडुरंग पावल्याची भावना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. मीना शेंडकर यांनी व्यक्त केल्या.
गडहिंग्लज येथील डॉ. घाळी सभागृह येथे शिक्षण मंच गुणगौरव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते मधुकर येसने तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिक्षक नेते मोहन मामा भोसले, युवा उद्योजक सुधीर पाटील, सुहास पाटील व गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांची उपस्थिती होती. गडहिंग्लज तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये शिक्षणमंचचे योगदान खूप मोठे असून मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी शुद्ध हेतूने काम करणाऱ्या शिक्षणमंचचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे असे शिक्षणाधिकारी सौ. शेंडेकर म्हणाल्या.
अध्यक्षीय मनोगतात शिक्षक नेते मधुकर येसने म्हणाले, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उपक्रमा सोबत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ शिक्षणमंचने दिले आहे. यावेळी नरेवाडी गावचे युवा उद्योजक सुधीर पाटील व सुहास पाटील या बंधूंनी शिक्षणमंचच्या या आदर्श कार्यासाठी पुढील पाच वर्ष प्रायोजकत्व देण्याची ग्वाही दिली.
जिल्हा नेते मोहन मामा भोसले यांनी शिक्षणाचे परिवर्तन करणार्या माऊली आपल्या जिल्ह्याला शिक्षणाधिकारी म्हणून लाभल्या असून त्या माणूसकिचा एक जिवंत झरा असल्याचे सांगितले.
गडहिंग्लज तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा व भविष्यातील वाटचाल आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमावेळी शिक्षणमंचच्या विविध 12 स्पर्धा व प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सहभाग घेतलेल्या 1541 विद्यार्थ्यांच्या पैकी यशस्वी झालेल्या एकूण 189 विद्यार्थांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक बँक संचालक नंदकुमार वाईंगडे, जिल्हा शिक्षक बँक माजी व्हाईस चेअरमन सुभाष निकम, जिल्हा शिक्षक संघ कार्याध्यक्ष डी. एस. खामकर, विस्तार अधिकारी एन.बी.कासार साहेब उपस्थित होते. प्रश्नपत्रिका निर्मिती करणारे राजाराम साळवे, श्रीधर खोराटे, वृषाली साबळे, संदीप नाईक, आरिफ चौगुले व देणगीदार आप्पा शिवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
गुणगौरव सोहळ्याचे आयोजन शिक्षणमंचचे मार्गदर्शक भरत शेळके व सचिव विक्रम गडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणमंचचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी तर सूत्रसंचालन आर.एन. पाटील व सचिन गवळी यांनी केले. पारितोषिक वितरण कार्यक्रम आयाज बागवान यांनी तर आभार शरद देसाई यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला आदर्श शिक्षक शंकर साळोखे, दिलीप पाटील शिक्षणमंचचे माजी अध्यक्ष बाळासाहेब वालीकर, पांडुरंग कापसे, विठ्ठल कदम, सूर्यकांत चौगुले, पी.सी.पाटील गुरुजी पतसंस्थेचे सभापती राजकुमार शिंगटे, उपसभापती आनंदा आजगेकार, शिक्षक संघ अध्यक्ष अनिल बागडी, नगरपरिषद अध्यक्ष विष्णू कुराडे, उर्दू संघटना अध्यक्ष मुबारक लाटकर, पंचायत समिती स्तर कर्मचारी पतसंस्था सभापती बाळासाहेब चौगुले, महिला आघाडी मार्गदर्शिका कल्पना येसने, संगीता काळगे, मालूताई जाधव, अध्यक्षा अर्चना निळकंठ, शिक्षणमंच उपाध्यक्ष वैशाली कोष्टी, गीता सानप, कविता माने, मालन पाटील या उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय शिंदे, संदीप बाबर, दिलीपकुमार शिंगटे, रमेश कोणुरी, उज्वल कुंभार, शरद पवार, सुनील कांबळे, रणजीत बागडी, अमित जाधव यांनी परिश्रम घेतले.




