Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुगळी येथील प्राथमिक शाळेत स्वामी कुटुंबीयांकडून शैक्षणिक साहित्य वाटप

गुरुवर्य गुरलिंगया स्वामी यांच्या 102 व्या जयंती निमित्त उपक्रम


गेली 40 वर्ष अखंडितपणे स्वामी कुटुंबीयांची सामाजिक बांधिलकी 






गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील विद्या मंदिर शाळेत  बाळेकुंद्री दत्त देवस्थानचे माजी संचालक, माजी मुख्याध्यापक प .पू गुरुवर्य गुरलिंगया स्वामी यांच्या 102 व्या जयंती निमित्त मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. दरम्यान, यावेळी विठ्ठल धनवडे यांनीही इयत्ता पहिलीच्या मुलांना शालेय बॅगांचे वाटप केले.



प्रतिमा पूजन मलिकार्जुन आरबोळे  यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत मुख्याध्यापक सुरेश यादव यांनी केले. यावेळी स्वामी कुटुंबियाकडून विद्यार्थ्यांना  वह्या, पेन, दप्तर, खाऊ  वाटप सरपंच मलिकार्जुन आरबोळे यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठल धनवडे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.





यावेळी बोलताना सरपंच मलिकार्जुन आरबोळे म्हणाले, गुरुलिंगया स्वामी यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त स्वामी कुटुंबियाकडून 1984 पासून आज तागायत म्हणजे गेली 40 वर्ष शैक्षणिक साहित्य वाटप अखंडितपणे सुरू आहे. ही बाब अभिमानास्पद असून स्वामी कुटुंबियांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यावेळी पुढील वर्षी पहिलीच्या विद्यार्थ्यांना दप्तर देण्याचे अभिवचन दुंडाप्पा पाटील यांनी दिले. सुरेश चव्हाण, श्रीपाद स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले.





कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सुरेश चव्हाण, उपाध्यक्ष रमेश चौगुले, चंद्रकांत माने, दुंडाप्पा पाटील, अनिता पाटील, अलका सूर्यवंशी, सरिता घोटणे, विठ्ठल धनवडे, अनिता शिंदे, अश्विनी कांबळे, वंदना महाडिक, सुरेखा चौगुले, श्रीपाद स्वामी, राहुल आरबोळे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते. आभार महादेवी यादव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.