Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी पंचक्रोशीसह सीमा भागातील विद्यार्थी- विद्यार्थिनी, महिला, गृहिणींना पदवीचे शिक्षण घेण्याची संधी!

हलकर्णी येथे शासन मान्यताप्राप्त नवीन महाविद्यालय सुरू 


मुला-मुलींसह, महिला, गृहिणींना बी.ए.चे शिक्षण घेण्याची सोय 


प्रवेश निश्चित करून संधीचा लाभ घेण्याचे महाविद्यालयाकडून आवाहन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बऱ्याच मुला मुलींना, महिलांना व गृहिणींना पुढील पदवीचे शिक्षण इच्छा असूनही  काही कारणास्तव घेणे शक्य होत नाही. मात्र आता हे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील हलकर्णी येथे पदवी शिक्षण घेण्यासाठी नवीन महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम. जी. पाटील यांनी दिली आहे. 



तांबाळेश्वर शिक्षण संस्था संचलित, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न 'हलकर्णी महाविद्यालय हलकर्णी' हे महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाले आहे. शैक्षणिक वर्ष 2024- 25 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या महाविद्यालयात बीए प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला व गृहिणी पुढील पदवीचे शिक्षण न घेतल्यामुळे शिक्षणात खंड पडतो. मात्र आता त्यांना या महाविद्यालयात प्रवेश घेऊन पुढील पदवीचे शिक्षण पूर्ण करणे शक्य होणार आहे. हलकर्णी परिसरातील विविध गावांसह सीमा भागातील पदवी शिक्षण इच्छुक मुले व मुली, महिला, गृहिणी यांच्या शिक्षणाची सोय झाली आहे. त्यामुळे हलकर्णी परिसर व सीमा भागातील इच्छुकांनी हलकर्णी बस स्टँड जवळील अंकली बिल्डिंग येथील महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष एम. जी. पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.