Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागाव येथील श्री शिवाजी विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तालुक्यातील महागाव येथील श्री शिवाजी विद्यालयात गुरुपौर्णिमा - व्यासपौर्णिमा निमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. बी. केसरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आर. एस. कांबळे यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सहावी 'अ' चे विद्यार्थी आणि वर्गशिक्षक ए. डी. नाटेकर यांनी केले होते.


प्रारंभी महर्षी व्यास ऋषींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक आर. एस. कांबळे यांनी गुरुचे महत्व, गुरुचे स्थान याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात  मुख्याध्यापक एस. बी. केसरकर म्हणाले, गुरूशिवाय जीवनात यशस्वी होता येत नाही. आई वडील  आणि आपले गुरुजन हे आपले पहिले गुरू आहेत. आपणास ज्या लहान थोर व्यक्तींकडून काही ना काही शिकता येते ते सर्व आपले गुरु होय. यावेळी शिक्षक एम. बी. पाटील, एस. ए. रेडेकर, एन. डी. रेडेकर यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.












Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.