Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेगिनहाळ येथील कुमार विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना छत्री, शैक्षणिक साहित्य वाटप

तेगिनहाळ : विद्यार्थ्यांना छत्री व शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी दयानंद पाटील, अयाज बागवान, संतोष पाटील, ज्योती फर्जंन.


गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तेगीनहाळ येथील कुमार विद्यामंदिर शाळेत  विद्यार्थ्यांना छत्री व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद पाटील होते.


     


यावेळी पुणे येथील कॅपजेमिनी कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनियर  इलियास पाटील (गडहिंग्लज) यांच्या वतीने  शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री,वह्या, पेन, पेन्सिल व इंग्रजी प्रायमर या शैक्षणिक साहित्याचे वाटप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद पाटील, सदस्य संतोष पाटील व ज्योती फर्जंन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालक व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अयाज बागवान यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.