Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये 'शाहू विचारांचा जागर'

गांधी विचार मंचचे प्रतिनिधी सुरेश पोवार यांनी केले मार्गदर्शन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी भाग हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज व व्यवसाय शिक्षण विभाग, गांधी विचार मंच गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षानिमित्त 'शाहू विचारांचा जागर' या विषयावर गांधी विचार मंचचे प्रतिनिधी सुरेश पोवार यांनी शाहू महाराजांच्या काळातील विविध योजना व आदर्श कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य राजीव पाटील तर पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.




यावेळी सुरेश पवार यांनी कोल्हापूर संस्थान  व इतर संस्थाने यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्या काळात  छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणावर 13 टक्के खर्च केला पण सध्या तीन टक्केच्या वर शिक्षणावर खर्च होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.



या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. यावेळी प्राचार्य राजीव पाटील यांनी मार्गदर्शन केले. पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांनी प्रशालेच्या विविध उपक्रमाची व योजनांचे कौतुक केले. कार्यक्रमास प्रकाश इंगळे, विकास पाटील, शामराव वडर, चंद्रकांत भोसले, ज्योत्सना जाधव, प्राची मुंगुरवाडी, सोमनाथ खानापुरे यांच्यासह कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख अविनाश कुराडे यांनी तर सूत्रसंचालन सौ. संगीता पोतदार यांनी केले. आभार राजाभाऊ सासणे यांनी मानले.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.