हत्ती-कोले-षण्मुगम चषक शालेय फुटबॉल
जागृती, सर्वोदया स्कुलला उपविजेतेपद
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील हत्ती-कोले- षण्मुगम शालेय फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षे गटात न्यू होरायझन स्कुल तर चौदा मध्ये शिवराज स्कुलने विजेतेपद पटकाविले. त्यांनी अनुक्रमे जागृती हायस्कुल, सर्वोदया स्कुलचा पाडाव केला. होरायझनचा स्वरूप दड्डी, शिवराजचा धैयशिल वाघ यांनी चौफेर खेळ करून स्पर्धावीराचा बहुमान मिळविला. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावरील या स्पर्धेत १६ संघानी सहभाग घेतला होता. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत गेले दोन दिवस हि स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचे यंदाचे तेरावे वर्ष होते.
सतरा वर्षाखालील अंतिम सामन्यात होरायझन स्कुलने हुकमी खेळाडू साई बनगेच्या गोलच्या हैटट्रिकमुळे जागृती हायस्कुलला ४-० असा सहज हरवत विजेतपद पटकाविले. सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व ठेवणा-या होराझनच्या खेळाडूंनी लागोपाठ चढायांचा धडाका लावत जागृतीला हैराण केले. स्पर्धावीर स्वरुप दड्डीने गोल करून विजयावर शिक्कामोर्तब करत सहका-याना जल्लोषाची संधी दिली. चौदा वर्षाच्या अंतिम सामन्यात शिवराज स्कुलने भरवशाचा खेळाडू आलोक पाटीलच्या निर्णायक गोलच्या जोरावर सर्वोदया स्कुलला १-० असे नमविले. सर्वोदयाच्या अर्थव बिरजें, श्रेयस मांगले यांची झूंज अपुरी ठरली.
युनायटेडचे उपाध्यक्ष सुरेश कोळकी, एम. आर. चे प्राचार्य संजय कुंभार, विनोद बिलावर, विश्वास देवाळे, निशिकांत गोरुले, शक्ती चौगुले यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धा प्रमुख प्रथमेश धबाले यांनी स्वागत केले. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी स्पर्धेचा आढावा घेतला. यावेळी प्रशांत दड्डीकर, मनिष कोले, सुभाष हत्ती, सी. आऱ. गुजर, सचिन शहा, उत्तम देसाई यांच्यासह खेळाडू, प्रशिक्षक, शौकिन उपस्थित होते. समन्वयक सौरभ शुभम आजगेकर यांनी आभार मानले. ललित शिंदे यांनी सुत्रसंचलन केले. सुरज हनिमनाळे, श्रवण जाधव, पार्थ म्हेत्री, सुमित कांबळे, अनिकेत कोले, श्रवण पाटील, आर्यन दळवी यांनी पंच म्हणून काम पाहिले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू :१६ वर्षे,१४ वर्षे
स्पर्धावीर - स्वरुप दड्डी(होरायझन) धैयशिल वाघ (शिवराज)
गोलरक्षक- सुमित पाटील(होरायझन), ध्रुव नलवडे (एमआर)
बचावपटू- वैभव सुतार (जागृती), श्रेयस मांगले (सर्वोदया)
मध्यरक्षक-वर्धन कांबळे (होरायझन), अनुज घोटणे (सर्वोदया)
आघाडीपटू-वेदांत देवार्डे (होरायझन), अर्थव बिरंजे (सर्वोदया).






