गजापूर गावातील ग्रामस्थांशी साधला संवाद
जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करत दिला दिलासा
स्थानिक नागरिकांनी मांडल्या आपल्या व्यथा
कोल्हापूर : खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील यांनी किल्ले विशाळगड परिसरातील गजापूर गावास भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यांच्याशी संवाद साधला तसेच जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करून त्यांना दिलासा देण्यात आला.
किल्ले विशाळगड येथील अतिक्रमणाशी कसलाही संबंध नसलेल्या गजापूर गावात घडलेली हिंसाचाराची घटना अतिशय दुर्दैवी असून संयमी कोल्हापूरकर धर्मांधतेच्या राजकारणापासून दूर राहून बंधुत्वाची भावना जोपासत संपूर्ण देशासमोर अनुकरणीय आदर्श ठेवतील,याची खात्री आहे. अशी प्रतिक्रिया खासदार श्री शाहू छत्रपती व आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, सत्यजित पाटील सरुडकर राष्ट्रवादीचे व्ही.बी. पाटील, आर.के. पोवार, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, कादर मलबारी, भारतीताई पोवार यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.




