Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुराचा एसटी महामंडळालाही फटका; गडहिंग्लज आगाराचे आतापर्यंत ३५ लाखाचे नुकसान

                                                            संग्रहित छायाचित्र 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): पूर परिस्थितीचा फटका एसटी महामंडळाला देखील बसला आहे. गेल्या सहा दिवसात पुरामुळे रस्ते बंद असल्याने एसटी वाहतूक बंद आहे. त्यामुळे गडहिंग्लज आगाराचे आतापर्यंत जवळपास 30 ते 35 लाखांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांनी दिली.



गडहिंग्लज तालुक्यात दिनांक १६ जुलैपासून हिरण्यकेशी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे गडहिंग्लज- चंदगड मार्गावरील भडगाव पूल तसेच या नदीवरील ऐनापुर, गजरगाव, हरळी, निलजी, जरळी, नांगनूर आदी बंधाऱ्यांवर पुराचे पाणी आल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंदच आहेत. त्यामुळे या मार्गावरील सर्व नियमित फेऱ्यांसह मुक्काम बसेस बंदच आहेत. नेसरी, नूल, हलकर्णी, कोवाडे, सरोळी यासह विविध भागातील बसफेऱ्या पुरामुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत.  सुरुवातीचे दोन दिवस हलकर्णी मार्गावर संकेश्वर मार्गे बसफेऱ्या सुरू ठेवल्या होत्या. मात्र संततधार पाऊस व पूरस्थितीमुळे एक दोन प्रवासी संख्या असल्याने या फेऱ्या देखील बंद करण्यात आल्या. त्यामुळे गेल्या सहा दिवसात गडहिंग्लज आगाराचे जवळपास 30 ते 35 लाखाचे उत्पन्न बुडाल्याचे आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.