Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत!

आमदार राजेश पाटील यांची प्रशासनाला सूचना


अरळगुंडी, नांगनूर, खणदाळ येथील पूर परिस्थितीची केली पाहणी 


शेतकरी, ग्रामस्थांच्या ऐकून घेतल्या व्यथा 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत अशा सूचना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील अरळगुंडी, नांगनूर, खणदाळ परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी आमदार राजेश पाटील यांनी काल केली.



यावेळी येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. आमदार राजेश पाटील यांनी तातडीने प्रशासनाला पंचनामे करावेत अशा सूचना दिल्या. ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आमदार राजेश पाटील यांनी केला.



यावेळी जिल्हा शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, सरपंच रवींद्र यरकदावर, सरपंच चेतन लखुंडे, विनोद मोकाशी, विकास मोकाशी, अजित वाळकी, अजित जाधव, दुंडाप्पा मगदूम, सुभाष कडलगे, दुरदुंडी पाटील, वसंतराव रावण, ज्ञानदेव मोकाशी, वर्धमान चौगुले, आप्पा शिंदे, महादेव नार्वेकर, हलकर्णीचे युवा उद्योजक, शिवकुमार संसुद्धी, प्रसाद जोशी, नागाप्पा पाटील, सुनिल पाटील उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.