गडहिंग्लज (प्रतिनिधी): खणदाळ येथे संततधार पावसामुळे खणदाळ पैकी कंकणवाडी वसाहतीतील चंद्रकांत भीमप्पा कळसान्नावार यांच्या राहत्या घराची भिंत व मंगलोरी कौले पडून सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. तसेच निंगवा कांबळे व पारवा कोनूरी यांच्या भिंतीचीही पडझड झाली आहे.

