रात्रीपासून पावसाची थोडी उसंत ; पुराचे पाणी संथ गतीने ओसरू लागले
गडहिंग्लज : भडगाव पुलावरील पुराचे पाणी फारच संथ गतीने ओसरत आहे. आज सकाळी साडेसहा वाजता टिपलेले हे छायाचित्र. ( छायाचित्र : वसंत नाईक, भडगाव )
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर सलग सहाव्या दिवशी पुराचे पाणी कायम आहे. काल रात्रीपासून थोडा पाऊस थांबला आहे. पुलावरील पाणी मात्र संथ गतीने उतरत आहे.
भडगाव पुलावर पाणी आल्याने गडहिंग्लज- चंदगड मार्गावरील वाहतूक अद्याप ठप्पच आहे. तालुक्यातील इतर बंधारेही पाण्याखालीच असल्याने गडहिंग्लजशी संपर्क साधणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. काल रात्रीपासून तालुक्यात पाऊस थांबला आहे त्यामुळे पुराचे पाणी फारच संथ गतीने उतरत असल्याने नागरिकांना उद्यापर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पुराच्या पातळीकडे प्रशासन व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा लक्ष ठेवून आहे. नदीकाठावरील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली आहे. रात्रंदिवस स्थानिक यंत्रणेशी संपर्क साधून माहिती घेतली जात आहे. उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार ऋषिकेत शेळके पूर आलेल्या भागांना दररोज भेटी देऊन परिस्थितीची माहिती घेत उपाययोजनाच्या सूचना देत आहेत.
व्हिडिओ येथे पहा 👇👇


