कीबोर्ड वरील खराब बटणांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
आमदार राजेश पाटील यांनी पत्राद्वारे वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष
मुंबई: दि.४, १०, ११, १२ व १३ जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क लिपीक पदाची इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी देत असताना कीबोर्ड वरील खराब बटणांमुळे विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत चाचणी देणे शक्य झाले नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर परीक्षा सुस्थितीत कीबोर्ड द्वारे पुन्हा एकदा घेण्यात यावी अशी मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात आमदार राजेश पाटील यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क लिपीक पदाची पवई, मुंबई येथील परिक्षा केंद्रावर दिनांक १०/११ जुलै रोजी इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी देत असताना कीबोर्ड मध्ये अडचणी होत्या कीबोर्ड मधील backspace, shift key आणि बरेच बटणे अडकत होती स्पेस बटण पुढे जात नव्हता अनेकदा दाबवा लागत होता. सदर परीक्षार्थी उमेदवारांनी आयोगाच्या नियमावलीनुसार त्यांना कीबोर्ड बदलून देण्याची विनंती केली परंतू त्यांनी ते कीबोर्ड बदलून दिले नाहीत तसेच वारंवार विनंती करून पण त्यांच्या कीबोर्ड समस्याकडे पूर्णपणे खात्रीशीर समस्यचे निराकरण न करता पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात दादा मागण्यास सांगितले. यामुळे कीबोर्डच्या खराब बटणामुळे निर्धारीत वेळेत टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्ण होऊ शकली नाही सबब पुर्व व मुख्य परीक्षेत सदर परीक्षार्थी उमेदवारांना कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स असूनदेखील केवळ कीबोर्ड व्यवस्थीत नसल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांनी सुस्थितीतीत कीबोर्डव्दारे पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे एमपीएससी विद्यार्थी उमेदवारांच्या भविष्याचा गांभीयनि विचार होवून सुस्थितीतील कीबोर्ड उपकरणाव्दारे सदर विद्यार्थ्यांची पुन्हा टंकलेखन चाचणी परीक्षा घेवून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली आहे.

