Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय योग खेळाडू सौ. सुलोचना मोरे रौप्य पदकाच्या मानकरी

डॉ. सौ. जयश्री पाटील व डॉ. सौ. माधुरी पाटील यांनी केला सत्कार 


गडहिंग्लज : सौ. सुलोचना मोरे यांचा सत्कार करताना योग कल्चर असोसिएशनच्या सचिव डॉ. सौ. जयश्री पाटील व योग पंच डॉ. सौ. माधुरी पाटील.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): नेपाळमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत गडहिंग्लज येथील सौ. सुलोचना विजय मोरे यांनी पारंपरिक योग प्रकारात रौप्यपदक मिळविले. दहावी इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा काठमांडूतील बोगनविला येथे झाली.




ही स्पर्धा पारंपरिक, रिदमिक, एकेरी व दुहेरी योगासन या प्रकारात झाली. कोल्हापूर योग कल्चर असोसिएशनच्या सदस्या व योगशिक्षिका सौ. सुलोचना मोरे यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना पारंपारिक योगासन स्पर्धेमध्ये रौप्य पदक संपादन केले.




या स्पर्धेत भारतातर्फे ४५, तर नेपाळच्या ३० स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारताने पारंपरिक योगामध्ये १४ सुवर्ण, तर रिदमिक स्पर्धेत सहा सुवर्णपदके मिळवित स्पर्धेवर वर्चस्व मिळवले. सौ. मोरे यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल योग कल्चर असोसिएशनच्या सचिव डॉ. सौ. जयश्री पाटील व योग पंच डॉ. सौ. माधुरी पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.