दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथील श्री गुड्डादेवीची यात्रा मोठ्या भक्ती भावाने उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी ९ वाजता देवीस अभिषेक, पूजा व आरती करून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. यात्रेसाठी भडगाव, गडहिंग्लजसह परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती.
यावेळी पोलीस पाटील उदय पुजारी, सुभाष चोथे, दयानंद पट्टणकुडी, बसाप्पा रेगडे, सिद्धाप्पा चिनगुडे, आप्पासाहेब मोर्ती, चिदानंद शिंत्रे, आप्पासो नाईक, शिवराज भकरी, दीपक चेतगिरी, बसाप्पा कोटगी, शंकर चोथे, गौतम बंदी, बाळासो मूर्ती, कुमार चोथे, वसंत नाईक यांच्यासह भाविकांनी मोठ्या संख्येने देवीचे दर्शन घेतले. सायंकाळी गावातील मंदिरापासून मुख्य रस्त्यावरून ते डोंगरावरील मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. आरती करून यात्रेची सांगता झाली. गावात दर मंगळवारी एक दिवस पाळक म्हणून पाळला जातो.




