Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज शहरातील होर्डिंगचे शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट करा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी 


जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी यांना निवेदन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील होर्डिंगचे शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी मनसेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. 




निवेदनात म्हटले की, गडहिंग्लज शहरात एकूण ४५ होर्डिंग होते. त्यापैकी २५ होर्डिंग बेकायदेशीर असल्याबाबत गडहिंग्लजचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सोमवार दि. ८ जुलैच्या बैठकीत स्पष्ट केले आहे. उर्वरित २० होर्डिंगचे कायदेशीर बाबी तपासून नोव्हेंबर २०२४ पर्यंत असणारी मुदत कायम ठेवण्यात आल्याचे सांगितले. पण यातील २० होर्डिंग पैकी काही होर्डिंग आजही धोकादायक स्थितीत उभे आहेत. ह्या होर्डिंगचे खाजगी स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. शहरातील बॅरिस्टर नाथ विद्यालयाच्या मैदानावरील होर्डिंग हे लहान मुलांच्या जीवितास धोकादायक असल्याची भीती आहे.  मुख्याधिकारी यांनी बैठकीत सर्वच होर्डिंगचे शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल असे स्पष्ट केले आहे. मुख्याधिकारी यांनी सांगितल्या प्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता आणि नगरपरिषदेचे नगर अभियंता यांनी संयुक्तिक होर्डिंगचे  स्ट्रक्चर ऑडिट करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या दोन तीन दिवसात तक्रारदार यांच्या उपस्थित ऑडिट करावे, मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनाप्रमाणे शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत शहरातील सर्व होर्डिंग वापरणे बंद ठेवावे. अशी मागणी या निवेदनातून केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर नागेश चौगुले, प्रभात साबळे, संदीप आळगुंडी, प्रथमेश शिंत्रे, मंगेश माळी, रामकृष्ण कदम, किशोर कदम आदींच्या सह्या आहेत.


 व्हिडिओ येथे पहा 👇




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.