Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शालेय निवडणुकीतून विद्यार्थ्यांनी घेतले ईव्हीएमचे धडे!

महागावच्या महात्मा फुले विद्यालयाचा उपक्रम 


     



गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजचे शालेय विद्यार्थी हेच भविष्यातील देशाचे मतदार आहेत. त्यामुळे शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची तीही ईव्हीएम निवडणूक प्रक्रियेची प्रचिती देण्याचा निर्णय महागाव येथील महात्मा फुले विद्यालयाने घेतला. या निर्णयाची यशस्वी कार्यवाहीसुद्धा करण्यात आली.




महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. नागरिक शास्त्रात शिकवलेले लोकशाहीची नीतिमूल्य विद्यार्थ्यांच्यात रुजावीत यासाठी निवडणुकीचे आयोजन केले होते. यावेळी पारंपरिक निवडणुकी ऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ईव्हीएम मशीनची प्रतिकृती असणारे वोटिंग ॲपद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी अठरा वर्षे वयाच्या आतच हा अनुभव घेतल्याने विद्यार्थी आनंदित होते. या निवडणूक प्रक्रियेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मतदान लौकिक देसाई याची विद्यार्थी प्रतिनिधी तर संचिता जावळे व मेघा स्वामी हिची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवडून आले. तसेच प्रत्येक वर्गातून वर्ग प्रतिनिधी निवडून देण्यात आले.



यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष सुतार यांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया व रमेश कळविकट्टे यांनी मोबाईलवरील वोटिंग ॲपवर मॉक पोल व मतदान कसे करावे याविषयी माहिती सांगत प्रात्यक्षिक करून दाखविले. निवडणूक कार्यक्रम जाहीर करत मंगळवार दि.२ रोजी विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे, अर्जाची छाननी करणे, बुधवार दि.३ रोजी अर्ज माघार घेऊन चिन्हांचे वाटप केले. गुरुवारी दि. शुक्रवार दि.४ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली. सोमवार दि. ८  निकाल घोषित करण्यात आला.




या निवडणूक प्रक्रिया दरम्यान मतदान केंद्र तयार करणे, मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती, मतदार याद्या, मतदार प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडणुकीतून विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी, वर्ग प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्राचार्य आय. एस. पाटील, संस्था प्रतिनिधी प्रा. डी. एस पाटील ,आण्णासाहेब पाटील,  पर्यवेक्षक मोहन कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. रमेश कळविकट्टे,संदेश कोकितकर, किरण पाटील यांनी नियोजन केले. सर्व विजयी उमेदवारांनी निकालानंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. विजय उमेदवारांचे सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.




 ईव्हीएम मशीनचा वापर





या निवडणूक प्रक्रियेत मोबाईलच्या साह्याने ईव्हीएम मशीनची प्रतिकृती असणारा वोटिंग ॲप मोबाईलवर डाऊनलोड करून घेतला. दोन मोबाईलवर कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटसाठी दोन मोबाईल ठेवण्यात आले. मतदान अधिकाऱ्याने बॅलेट युनिटवरील बॅलेट सोडल्यानंतर विद्यार्थी मतदारांनी कंट्रोल युनिटवर पसंतीच्या उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान नोंदवले. त्यावेळी बिपचा आवाज होत होता. या आगळ्यावेगळ्या मतदान प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना मतदान केल्याचा आनंद झाला.


 व्हिडिओ येथे पहा 👇







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.