Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी चांगले ज्ञान आत्मसात करावे : प्राचार्य आर. एस. पाटील

हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात संपन्न


 

हलकर्णी:. पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्राचार्य आर एस पाटील, पर्यवेक्षक के बी पाटील, पत्रकार अमानुल्ला मालदार व इतर. 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
विद्यार्थ्यांनी  केवळ परीक्षार्थी न बनता चांगले ज्ञान आत्मसात करावे. इयत्ता दहावी ही जीवनातील महत्त्वाची पायरी आहे. सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम व सकस आहार घेतले पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य आर. एस.पाटील यांनी केले.



हलकर्णी : पत्रकार अमानुल्ला मालदार यांचा सत्कार करताना पर्यवेक्षक के. बी. पाटील.

 

तालुक्यातील हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये आयोजित पालक मेळाव्यात अध्यक्षानावरून ते बोलत होते. प्रारंभी पालक माजी सैनिक अजित चौगुले यांच्यासह पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत बालाजी पवार यांनी केले.  पालकांच्या काही अडचणी असतील तर त्यांचे निरासन आम्ही नक्की करू, सराव परीक्षा, चाचणी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती वेळोवेळी आम्ही पालकांना देऊ असे सांगितले. प्रास्ताविक आर.जी.ढेरे यांनी केले. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक वापर टाळावा यासह  पालकांना काही महत्त्वपूर्ण सूचना या बैठकीत करण्यात आल्या.



यावेळी पत्रकार अमानुल्ला मालदार, विजयकुमार संगाज, डी.एस.बंदी, पी. एस.तांबडे, स्वाती पोतदार यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यवेक्षक के.बी.पाटील यांनी आभार मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.