पुलाचे रेलिंग दिसू लागले ;आज दिवसभरात वाहतूक सुरू होण्याची शक्यता
मात्र अद्याप तरी पुलावरील वाहतूक बंदच
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी घटत असून गडहिंग्लज - चंदगड राज्यमार्गावरील भडगाव पुलावरील पुराचे पाणी हळूहळू ओसरत आहे. पुलावर आता दोन फूट पाणी आहे. पुलावरील लोखंडी रेलिंग आता दिसू लागले आहेत. आज दिवसभरात या मार्गावरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र पावसावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे अद्याप तरी पुलावरून वाहतूक बंद आहे.
संततधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीला पूर आला आहे. त्यामुळे आठवडाभर भडगाव पुलासह तालुक्यातील विविध बंधारे पाण्याखाली आहेत. कालपासून पाऊस थांबल्याने गजरगाव बंधाऱ्यावरील पाणी ओसरले होते. भडगाव पुलावरील पुराचे पाणी संथ गतीने ओसरत होते. मात्र काल दिवसा व रात्रभर पाऊस थांबल्याने पुराचे पाणी आता हळूहळू कमी होत आहे. पुलावर आता दोन फूट पाणी आहे. संपूर्ण पाण्यात बुडालेला पूल आता दिसू लागला आहे. पुलावरील संरक्षक लोखंडी रेलिंगचा कठडा आता दिसू लागला आहे.
अद्याप वाहतूक बंद ; वाहनधारकांनी गडबड करू नये : पोलीस पाटील उदय पुजारी
भडगाव पुलावर आज सातव्या दिवशी अजून दोन फूट पाणी आहे. पाणी ओसरण्यास सुरू झाले आहे. आज दिवसभरात वाहतुकीस हा पूल खुला होण्याची शक्यता आहे, मात्र पाणी हळूहळू ओसरत असल्याने पाणी उतरण्यास वेळ लागणार आहे. पुरामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचे थर साचलेले आहे. त्यामुळे गाड्या घसरून दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अग्निशमन यंत्रणेच्या साह्याने सदर पुलावर पाणी मारून स्वच्छता केली जाणार आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून हिरवा कंदील दिल्यानंतर शासकीय यंत्रणेच्या परवानगी नंतर वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे वाहन वाहन चालकांनी व नागरिकांनी घाई करू नये असे आवाहन आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य व भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी, वसंत नाईक यांनी केले आहे.
पुराच्या पाण्याकडे भडगावची टीम लक्ष ठेवून
सरपंच सौ. वंदना शेंडुरे, उपसरपंच विजय पट्टणकुडी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक दत्तात्रय वायदंडे, ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी सौ रुपये कांबळे, पोलीस पाटील उदय पुजारी, ठाकरे पक्ष शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख वसंत नाईक टीम पुराच्या पाण्याकडे लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर भडगाव येथील पोलीस कॉन्स्टेबल विजय बंदी पुलावर पाणी आल्यापासून या ठिकाणी कार्यात आहेत.
रिक्षा चालक सचिन हरळीकर यांची सामाजिक बांधिलकी
हिरण्यकेशी नदीला पूर आल्यापासून भडगाव गावात काही घरांची पडझड झाली आहे. याची पाहणी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीमला रिक्षा चालक सचिन हरळीकर यांनी आपली रिक्षा सेवेसाठी उपलब्ध करून दिली. ते स्वतः रिक्षा चालवत या टीमला प्रत्येक पडझडीच्या ठिकाणी जाण्यासाठी मदत केली. त्यामुळे रिक्षाचालक सचिन हरळीकर याची सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद आहे.
व्हिडिओ येथे पहा 👇👇


