Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव पूल अद्याप पाण्याखालीच ; वाहतूक ठप्पच

निलजी, जरळी, ऐनापुर बंधार्‍यांवर देखील पाणी कायम 


तालुक्याच्या पूर्व भागाचा संपर्कच तुटला




गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी  नदीवरील भडगाव पूल काल दुपारपासून अद्याप पुराच्या पाण्याखालीच आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याने पूर्व भागासह चंदगडचा संपर्क तुटला आहे. निलजी, जरळी, ऐनापुर हे बंधारे देखील पाण्याखालीच असल्याने जनजीवन विस्कळीत बनले आहे. 



भडगाव पूल यंदाच्या पावसात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. पश्चिम भागात सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी दुपारी भडगाव पुलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आज बुधवार देखील पुलावर पुराचे पाणी जैसे थे आहे. पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने  पुलावरील पाणी हळूहळू पुन्हा वाढत आहे. पुलावरून  पायी येणे जाणे देखील आता  बंद करण्यात आल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, तलाठी सौ. रूपाली कांबळे, ग्रामसेवक राजेंद्र गवळी, कोतवाल किरण कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल विजय बंदी भडगाव पुलावरील पुराच्या पाण्याकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यासोबत रिक्षा चालक सचिन हरळीकर हे देखील कार्यरत आहेत.



तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी केली पाहणी 


दरम्यान, आज सकाळी गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी भडगाव पुलावरील पूरस्थितीची पाहणी केली. सर्व परिस्थितीची माहिती त्यांनी घेतली. खबरदारी म्हणून पुलावरून कोणालाही सोडण्यात येऊ नये अशी सूचना त्यांनी दिल्या.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.