Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला ठाकरे शिवसेनेच्या भगवा सप्ताहाचा प्रारंभ

ग्रामदैवत श्री. काळभैरव देवाला घातले गाऱ्हाणे


प्रचार रथाचे करण्यात आले उदघाटन






गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजला शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ) भगवा सप्ताहाचा प्रारंभ ग्रामदैवत श्री काळभैरव देवाला गाऱ्हाणे घालून करण्यात आला.



प्रारंभी श्री काळभैरव देवासमोर मशालीचे पुजन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख अजित खोत यांनी देवासमोर गाऱ्हाणे घातले. त्यानंतर शिवसेना व पक्षाचे  मशाल चिन्ह प्रत्येक घराघरात पोहचवण्यासाठी प्रचार रथाचे उदघाटन करण्यात आले. सदर रथावर पक्षाची प्रचार गिते, मशाल व भगवा सप्ताहाचे डिजीटल फलक लावण्यात आले आहे. या भगवा सप्ताहाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने प्रत्येक गावात डिजिटल फलक लावण्यात येत आहेत. तसेच मशाल चिन्ह, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विचारांचे छायाचित्रासह  असणारे पत्रक घरोघरी वाटप करण्यात आले.



 

दरम्यान, बड्याचीवाडी येथे सभासद नोंदणी करण्यात आली. प्रचार रथाच्या माध्यमातून दररोज दोन गावांमध्ये शिवसेना पक्षाचे विचार व चिन्ह याचा प्रचार करण्यात येत आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हाप्रमुख  प्रा. सुनिल शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख डाॅ. रियाजभाई शमनजी, कागल विधानसभा संपर्क प्रमुख दिनकर जाधव, युवासेना जिल्हाधिकारी अवधुत पाटील, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, कागल तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, उपतालुकाप्रमुख समीर देसाई, गडहिंग्लज उपतालुकाप्रमुख सुरेश हेब्बाळे, वसंत नाईक, भरत जाधव, विभागप्रमुख राजु रामजी, आनंदा माने, शाखाप्रमुख हिंदुराव खोत, संभाजी हजारे, रमेश जाधव, उपशहरप्रमुख संदिप चव्हाण, युवासेना पदाधिकारी सुजित पाटील, उत्तम गोरूले, संतोष नाईक, संभाजी यरूडकर यांच्यासह शिवसैनिक, युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.