Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निलजीच्या आठ तरुणांची शासकीय नोकरीत वर्णी

ध्येय व स्वयंप्रेरणेतून यशाला घातली गवसणी 





गडहिंग्लज (रवी गवळी) : केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून होत असलेल्या भरतीत विविध पदावर गेल्या चार महिन्यात निलजी (ता. गडहिंग्लज) येथील आठ तरुणांची नियुक्ती झाली आहे. तर आणखी तिघा विद्यार्थ्यांचे अंतिम निकाल लागणे बाकी आहे.  हे यशस्वी युवक कोठेही क्लासेस न लावता मैदानी चाचणीसाठी रस्त्यावर धावून, घरी सराव व स्वयंअध्ययन करीत यशाला गवसणी घातली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था व जागेअभावी येथे मैदानाचा प्रश्न गेले कित्येक वर्षे रखडलेला आहे. तरीही केवळ ध्येयाने प्रेरित होऊन मिळवलेले यश वाखाण्याजोगे आहे. यामुळे या युवकांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.




निलजी हे संकेश्वर-बांदा या राष्ट्रीय महामार्गावरील व हिरण्यकेशी नदीकाठी वसलेले तीन हजार लोकवस्तीचे छोटे पण सधन गाव.  उच्च शिक्षणामुळे पुढची पिढी कालांतराने बदलली, शिक्षणाचे महत्त्व समजून तरुण करिअर करण्याकडे वळला. आई-वडिलांचे कष्ट व मेहनत यांची जाणीव ठेवून स्वयंप्रेरनेतूनच नेहमीच प्रगती साधत आपल्या स्वप्नाला आकार देत राहिला. न्यायाधीश, पोलीस उपनिरीक्षक, सैनिक, सीमा सुरक्षा दल, रेल्वे, वनरक्षक, बँक लिपिक, एसटी महामंडळ मध्ये वाहक, चालक व मेकॅनिक, शिक्षक, वकील, पोलीस शिपाई, तलाठी या सारख्या अनेक पदावर यशस्वी होऊन आपल्या जीवनाला आकार दिला.



हीच परंपरा पुढे चालू ठेवत लोहित बागडी यांनी केंद्र सरकारची मुंबई येथील भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये- टेक्निशियन, रोहित पाटील सातारा सार्वजनिक बांधकाम विभागात -कनिष्ठ अभियंता, अमर परीट - मुंबई पोलीस, बाबासाहेब बेळगावी - पुणे पोलीस, संजय लठ्ठी- सिंधुदुर्ग पोलीस, समद नदाफ - सेंट्रल पोलीस, रुद्रगोंडा पाटील - सेंट्रल पोलीस, विरपक्ष मजगी - कोल्हापूर पोलीस, यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. आणखी तिघांचे अंतिम निकाल प्रलंबित आहे. यानिमित्त ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने  सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.