कोल्हापूर : येथील न्यू वुमन्स फार्मसीच्या विद्यार्थिनींनी एकत्र येत कोलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणाचा निषेध केला.
यावेळी विद्यार्थिनीनी महिलांवर होणारे अत्याचार व अशा घडणाऱ्या घटनांचा विविध फलकाद्वारे निषेध केला व घडलेल्या घटनेतील कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे तसेच गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी सर्व विद्यार्थिनी, कॉलेजचे प्राचार्य रविंद्र कुंभार, प्रा. वैष्णवी निवेकर, प्रा. पियुषा नेजदार, प्रा. दिव्या शिर्के, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



