भडगावच्या तलाठी सौ. रुपाली कांबळे, कृषी सहाय्यक अनिल कांबळे यांचे कौतुकास्पद काम
शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत नुकसानीचे पंचनामे
![]() |
| भडगाव : चिखल व पाण्यातून जात प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करताना तलाठी सौ रुपाली कांबळे, कृषी सहाय्यक अनिल कांबळे. सोबत शेतकरी बांधव. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे गडहिंग्लज तालुक्यात शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील भडगाव येथील तलाठी सौ. रुपाली कांबळे व कृषी सहाय्यक अनिल कांबळे यांनी पिक नुकसानीचे पंचनामे गुडघाभर चिखलातून, शेतात थांबलेल्या पाण्यातून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जात करत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
तहसीलदार कृषिकेत शेळके यांच्या आदेशानुसार तालुक्यातील शेत पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. भडगाव येथे आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना पुरामुळे झालेल्या नुकसानी संदर्भातील पंचनाम्या बाबत माहिती दिली जात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती घेऊन पंचनामे केले जात आहेत.
भडगावच्या तलाठी सौ. रूपाली कांबळे व कृषी सहाय्यक अनिल कांबळे यांनी शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष बांधावर जात पीक नुकसानीची पाहणी करत आहेत. चिकल व शेतवडीत थांबलेल्या पाण्याची तमा न बाळगता पंचनामे करत आहेत. त्यांना आपत्ती व्यवस्थापन समिती, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय वाईंगडे यांची साथ मिळत आहे. नुकसानीपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी ते मोठ्या तळमळीने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करत आहेत.






