Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील फुटबॉल स्पर्धेत एम.आर, शिंदे हायस्कुलची विजयी सलामी

सुनिल चौगुले स्मृती चषक फुटबॉल स्पर्धा 


गडहिंग्लज, शिवराजची आगेकूच; अखिलेश कुराडेची हॅटट्रिक 



गडहिंग्लज :शालेय फुटबॉल स्पर्धेचे फुटबॉलला किक मारून कावेरी चौगुले यांनी उदघाटन केले. यावेळी सुरेश कोळकी, महादेव पाटील, गौरी संकपाळ, शक्ती चौगुले आदी. 



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत सुरु झालेल्या १५ वर्षाखालील शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराणी राधाबाई हायस्कुल (एम.आर), विजयामाला शिंदे हायस्कुल (वि. दि.), गडहिंग्लज हायस्कुल, शिवराज स्कुलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. शिवराजच्या अखिलेश कुराडेने गोलची हॅटट्रीक करुन दिवस गाजवला. सुनिल चौगुले यांच्या स्मृतीपित्यर्थ या स्पर्धा सुरु आहेत. एम.आर. हायस्कुलच्या मैदानावरील स्पर्धेत १२ संघानी सहभाग घेतला आहे.




माजी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उदघाटन केले.  श्री. कोले यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष सुरेश कोळकी, महादेव पाटील, शक्ती चौगुले, प्रशांत बाटे, प्रशांत दड्डीकर, यश पाटील, पार्थ म्हेत्री, सौ. गौरी संकपाळ उपस्थित होते. समन्वयक सुल्तान शेख यांनी आभार मानले. चुरशीच्या सामन्यात जागृती हायस्कुलने साधना हायस्कुलचा टायब्रेकरमध्ये ३-२ असे नमविले. निर्धारित ०-० अशा  बरोबरीतील सामन्यात टायब्रेकरमध्ये जागृतीच्या आर्यन पाटील, रणवीव भालेकर, वेदांत कडूकर तर साधनाच्या अनमोल तरवाळ, श्रद्धेय साठे यांनी गोल केले.शिवराज स्कुलने सर्वोदया स्कुलचा ३-१ तर गडहिंग्लज ब संघाचा १० गोलनी फडशा पाडला. अखिलेश कुराडेने हॅटट्रिक केली.




वि.दि. शिंदे हायस्कुलने सत्यजित पाटील, आदित्य लाटकरच्या गोलच्या जोरावर गडहिंग्लज हायस्कुलला २-१ असे पराजीत केले. गडहिंग्लज हायस्कुलचा दिपक पाटीलचा गोल संघाचा पराभव टाळू शकला नाही. एम.आर. हायस्कुलने साई इंटरनॅशनलचा २-० असे हरविले. एमआरच्या श्रषीकेश भोसले, स्वरुप शेटके यांनी गोल करून मोलाची कामगिरी केली. गडहिंग्लज हायस्कुल ब संघाने साधना भडगावला सडनडेथमध्ये ४-३ अशी मात केली. पुर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. टायब्रेकरमध्येही २-२ अशी बरोबरी राहिली. सडनडेथमध्ये ३-२अशी गडहिंग्लज हायस्कुलने बाजी मारली. भडगावच्या सुमित पानारी, हर्षद बंदी, सार्थक धनवडे तर गडहिंग्लजच्या समर्थ गुंठे, समर्थ कुराडे, साद मकानदार, अनुप यांनी गोल केले. न्यू होरायझनने साधनावर ४-० अशी सहज मात केली. होरायझनच्या वीर पाटीलने दोन तर तेजस पाटील, सुयश सावंतने प्रत्येकी एक गोल केला.



नवोदितांना उत्साह


दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मैदानावर पाणीच पाणी झाले. पण, नवोदितांचा पावसातही उत्साह ओसंडून वाहत होता. खेळाडूंना अधिक सामने खेळायला मिळावेत म्हणून संयोजकांनी प्रत्येकी तीन संघाचा एक गट करून प्राथमिक साखळी सामने घेतले. प्रत्येक गटातील अव्वल उपांत्य फेरीत पोहचेल. सामने पाहण्यासाठी पालकांची गर्दी होती.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.