Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चिक दुधाचे सेवन हेच बाळाचे पहिले लसीकरण!

स्त्री रोगतज्ञ डॉ. प्रतिभा चव्हाण यांचे मत 


'संत गजानन नर्सिंग'मध्ये जागतिक स्तनपान सप्ताह 




महागाव: जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त येथील संत गजानन नर्सिंग महाविद्यालयात जनजागृती करण्यात आली यावेळी या उपक्रमाची माहिती देताना डॉ. प्रतिभा चव्हाण व विद्यार्थी. 



गडहिंग्लज (प्रतिनिधी): प्रसूती नंतर प्रथमच आईला येणारे दूध हे घट्ट व पिवळसर असते. अर्धा तासाच्या आत बाळाला स्तनपान देण्यासाठी आग्रही असले पाहिजे हे स्तनपान बाळासाठी अमृत आहे. यामुळे बाळाचे जंतूसंसर्गापासून संरक्षण होऊन  रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून हेच दूध बाळाचे पहिले लसीकरण असल्याचे मत गडहिंग्लज तालुका स्त्रीरोग प्रसूती  संघटनेच्या अध्यक्षा व महागाव येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या स्त्री रोगतज्ञ डॉ. प्रतिभा चव्हाण यांनी दिला.



गडहिंग्लज तालुका स्त्रीरोग प्रसूती असोसिएशन व संत गजानन नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने  जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्त आयोजित पथनाट्य उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.



डॉ. चव्हाण पुढे म्हणाल्या, मातेचे दूध हे बाळासाठी आवश्यक पोषण मूल्याचे स्त्रोत आहे. बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले मेद, कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्व आणि खनिजे हे घटक त्यात योग्य प्रमाणात असतात त्यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास होण्याबरोबरच त्यांची प्रतिकारशक्ती ही वाढते त्यांचे अनेक आजारापासून संरक्षण होण्यास मदत होते. स्तनपानाचे फायदे बाळाबरोबर आईलाही होतो यामुळे आई व बाळा मधील भावनिक बंध घट्ट होण्यास मदत होते. स्तनपानाचे अनेक फायदे असताना अजूनही काही महिलांमध्ये गैरसमज आहेत ते दूर होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



दरम्यान, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यानी पथनाट्य सादरीकरण , पोस्टर प्रदर्शनच्या माध्यमातून स्तनपानाचे महत्त्व, मातेचा आहार याविषयी माहिती दिली. यासाठी हॉस्पिटल आवारातील महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सप्ताह निमित्त सात ऑगस्टपर्यंत दररोज महागाव, नेसरी, नूल, गडहिंग्लज परिसरातील वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयात हा उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी डॉ. सुप्रिया रुद्रापगोळ, डॉ. सीमा पाटणे, डॉ. सुरेश कदम,डॉ. गौरी गणपते प्राचार्या सुजाता शेवाळे, प्राचार्य गजानन हतरोटी, प्रा.स्टेपी करविनकोप्पा प्रा.कविता जाधव, प्रा. नेहा शास्त्री यासह नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य मिळत आहे.




किमान दोन वर्षे स्तनपान आवश्यक!


डॉक्टर चव्हाण म्हणाल्या, जन्मापासून सहा महिने होईपर्यंत पूर्णपणे स्तनपान आणि नंतर किमान दोन वर्षापर्यंत स्तनपानाबरोबर पूरक आहार बालकांना सुरू ठेवावा स्तनदा मातेने ही या काळात संतुलन आहार घेणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.