समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील अनिकेत मंगल कार्यालयात रविवार दि. २५ रोजी सकाळी १० वाजता हणबर गवळी समाज उन्नती संस्थेच्या वतीने हणबर गवळी समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हणबर गवळी समाजाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब कलागते हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. डॉ गंगाधर व्हसकोटी यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्यासह विविध पदावर निवड झालेल्या व्यक्ती तसेच इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. मेळाव्याला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन गौरव सोहळा व सत्कार समिती अध्यक्ष लक्ष्मणराव नवलाई व उपाध्यक्ष शामराव खोत यांनी केले आहे.

