तोंडाला काळी पट्टी बांधून बदलापूर घटनेचा केला निषेध
गडहिंग्लज (प्रतिनिधी): बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून 'तोंड बंद आंदोलन' केले.
यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, शहर प्रमुख संतोष चिकोडे, युवा सेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, माजी जिल्हा परिषद सदस्य विद्याधर गुरबे, माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक, दिग्विजय कुराडे, राजशेखर येरटे, बसवराज आजरी, सुनीता पाटील, विना कापसे, सुधाकर जगताप, सुरेश हेबाळे, दिगंबर पाटील, संदीप चव्हाण, संदीप कुराडे, शिवाजी राऊत, बाळू कुंभार, काशिनाथ गडकरी, श्रीशैलापा साखरे, नितीन देसाई, सागर पाटील, कमलेश गोरूले, संभाजी हजारे, संभाजी येडुरकर, बसवराज आरबोळे, मनीष हावळ, प्रकाश रावळ, भरत जाधव, आनंदा माने, अंकुश रणदिवे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



