गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी भाग हायस्कूल येथे शैक्षणिक वर्ष 2024 - 25 मधील इयत्ता 5 वी वर्गाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक आर. एस. पाटील यांनी पाचवी पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याबद्दल मार्गदर्शन केले. या पालक मेळाव्याचे आयोजन पाचवी इयत्तेचे वर्गशिक्षक आर. एस. मठपती व सौ. एस. पी होडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एम. पवार तर आभार प्रशालेचे पर्यवेक्षक के. बी. पाटील यांनी मानले. याप्रसंगी हिंदी विषयाच्या शिक्षिका सौ. एस. जी. पोतदार, पालक वर्ग उपस्थित होता.



