Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी चंदगडमध्ये युवा सेनेची स्वाक्षरी मोहीम



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणलेल्या 'शक्ती कायद्याची' लवकरात लवकर अंमलबजावणी करावी या मागणीसाठी चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाटा येथे युवा सेनेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. 



सदर मोहीम युवासेना विस्तारक डॉ.सतीश नरसिंग व युवासेना  कोल्हापूर जिल्हा अधिकारी अवधूत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी जिल्हा संघटिका शांताताई जाधव, तालुका संघटक विक्रम मुतकेकर, युवासेना तालुका प्रमुख गणेश बागडी, युवासेना तालुका प्रमुख किरण नागुर्डेकर यांच्यासह र्कीती पाटील, रेणुका भाटे, नितीन सुतार, प्रविण कोळशेकर, भरमु बिर्जे, युवासेना, युवती सेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.