Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तलाठीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कार्यालयातच केली हत्या

हिंगोली जिल्ह्यात भर दुपारी घडलेल्या घटनेने राज्यात खळबळ 

 

घटनेचा राज्यभरातील तलाठी संघटनेकडून निषेध 





हिंगोली : हिंगोली येथे तलाठी कार्यालयात घुसून तलाठीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला करत हत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. संतोष पवार (वय 36) असे या हत्या झालेल्या तलाठीचे नाव आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असणाऱ्या आडगाव येथे ही घटना काल बुधवारी दुपारी घडली आहे. या घटनेचा राज्यातील तलाठी संघटनेने निषेध नोंदविला आहे.



याबाबतची अधिक माहिती अशी की, वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे) येथे तलाठी संतोष पवार हे कार्यालयात काम करत होते. ठिकाणी एक जण दुपारी शेतीच्या कामासाठी तलाठी कार्यालयात आला होता. त्या कामावरून तलाठी व संबंधित व्यक्ती यांच्यात बाचाबाची झाली. यातूनच त्या व्यक्तीने तलाठी पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली धारदार चाकूने वार केल्याने तलाठी पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी परभणी या ठिकाणी हलविण्यात आले मात्र उपचाराला नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.