Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराजच्या ग्रीन क्लबच्या वतीने ‘पाणी आणि वीज बचत संवर्धन’ विषयावर प्रबोधन



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालय ग्रीन क्लब आणि संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन साक्षरता’ अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत जैवविविधता, पाणी आणि ऊर्जा साक्षरता करण्यासाठी म्हणून जैवविविधता अंतर्गत जैवपरिसंस्थेमध्ये अस्तित्वात असलेली प्राणी, कीटक आणि इतर घटक यांचा मानवी संबंधातील उपयोग आणि त्यांची जपणूक मानवी विकासासाठी उपयोग आणि त्याचे अस्तित्व यासंदर्भात करणारे भिंती पत्रकाचे उदघाटन शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले.




या भित्तीपत्रकाच्या निमित्ताने ग्रीन क्लब च्या वतीने पाणी आणि ऊर्जा  याचे मानवी जीवनातील महत्त्व आणि  त्याचे कशा पद्धतीने काळजीपूर्वक त्याचा वापर केला पाहिजे याचे मार्गदर्शन करणाऱ्या भिंतीपत्रकाचे नियोजन करण्यात आले होते.




पाणी आणि ऊर्जा निर्मितीचे नैसर्गिक स्त्रोत आणि त्याचा वापर यासंदर्भात माहिती देऊन ही ऊर्जा आपण कशा पद्धतीने वापरली पाहिजे त्या संदर्भात या भित्तीपत्रकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागृती करण्यात आली तसेच पाणी या संदर्भात भारतातील पाण्याची उपलब्धता आणि त्याचा वापर हे दर्शवणाऱ्या भित्तीपत्रकातून विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्यात आली हे पाणी जर आपण काळजीपूर्वक वापरले नाही तर त्याचा भविष्यात आपल्याला काय तोटा होऊ शकतो या संदर्भात भित्तीपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्देशाचे स्पष्टीकरण करताना ग्रीन क्लबचे समन्वय डॉ. अण्णासाहेब हरदारे यांनी विद्यार्थ्यांना पाणी आणि ऊर्जा यांचे नैसर्गिक स्रोत कोण-कोणते आहेत यासंबंधी मार्गदर्शन केले. हे नैसर्गिक स्रोत जर आपल्या माध्यमातून जर जतन केले नाही तर काय परिणाम होणार आणि आपल्याला या दोन्ही गोष्टींची पूर्ण निर्मिती करता येणार नाही कारण हे दोन्ही स्रोत हे नैसर्गिक आधारावरती अवलंबून आहेत आणि हे स्रोत बचतीवरतीच अवलंबून आहेत. जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात याची बचत केली नाही तर त्याचा आपल्याला परिणाम जाणवू शकतो कारण पाणी आणि ऊर्जा ही परत निर्माण करता न येणारी गोष्ट आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी बचत म्हणजेच त्याची निर्मिती आणि त्याचा आयुष्यभर वापर या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन ग्रीन क्लबच्या सह समन्वयक प्रा.सुनीता देसाई यांनी केले.



यावेळी संस्थेच्या संचालिका सौ.बिनादेवी कुराडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या पाणी आणि उर्जा यांचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमासाठी डॉ. अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम. कदम यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात प्रा.संदीप कुराडे,  प्रा.सौ. आदाटे, प्रा.के.एस.देसाई,  विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.