गडहिंग्लजला अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मूक आंदोलन
कार्यकर्त्यांनी नोंदविला घटनेचा निषेध
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मालवण येथील राजकोट किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आहे. सहा महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला सदर पुतळा पडतो ही घटनाच अनाकलनीयआहे. पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य अशा त्रुटी राहिल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी गडहिंग्लज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) यांच्यावतीने गडहिंग्लज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मुक आंदोलन करण्यात आले व मूक मोर्चाने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या प्रकरणी दोषी असणाऱ्या सर्व घटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी व भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत यासाठी प्रशासनाच्या वतीने कठोर उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी गडहिंग्लज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते महाबळेश्वर चौगुले, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, जयकुमार मुनोळी, आर. एस. पाटील, वसंत चौगुले, रवी यरकदावर, मुन्नासाहेब नाईकवडी, दशरथ कुपेकर, सागर देसाई, पी. एम. चव्हाण, माजी सभापती इकबाल काझी, आप्पासाहेब गडकरी, विकी कोणकेरी, जयसिंग चव्हाण, प्रवीण शिंदे, दयानंद देसाई, शुक्राचार्य चोथे, प्रदीप कडुकर, नारायण पाटील, रामलिंग दुध्यागोळ, बशीर पठाण, अभिजीत पाटील, नागाप्पा पाटील, सदाशिव सावंत, बाबुराव चौगुले, अण्णासाहेब पाटील, सुरेश गुलगुंजी, रणजीत पाटील, प्रसाद जोशी, संदीप शिंदे, लक्ष्मण तोडकर, शिवानंद देसाई, अजितराव जाधव, राजू पोवार, शिवकुमार संसुद्धी, दयानंद तोडकर, सचिन भोई, नाना पाटील, शिवगोंड पाटील, भरत पाटील, तानाजीराव कांबळे, सहदेव कोकाटे, वैभव पाटील, भीमगोंडा देसाई, वैभव कानडे, सुरेश गाडीवडर, रमेश कलगोंडा, वासिम पठाण, बसवराज काळसाणावर, तानाजीराव भोसले, अमर हिडदुग्गी, दयानंद नाईक, राजू कलकुटकी, नरसिंह माळी, मनोहर शिंदे, सोमनाथ घेजजी, सुशांत नौकुडकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


