Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला श्री. शिवशाहू शिक्षक शिक्षकेतर सेवक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील श्री. शिवशाहू शिक्षक शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही एस. आल्लूरकर सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.




संस्थेचे चेअरमन संजय बाळू केसरकर व व्हा. चेअरमन उत्तम देवाप्पा राऊत व संचालक मंडळ यांनी छ. शिवाजी महाराज व छ. शाहू महाराज यांचे फोटो पुजन व दिपप्रज्वलन करुन संस्थेची वार्षिक सभेचे सुरवात केली.




संस्थेचे चेअरमन संजय केसरकर यांनी स्वागत केले, व दिवंगत झालेल्या सर्व क्षेत्रातील व्यक्तिना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ज्या सभासद पाल्यांनी शिष्यवृत्ती, १० वी, १२ वी परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे त्या सभासद पाल्यांचा प्रमाणपत्र, रोख बक्षीस व गुलाब पुष्प देऊन संस्थेचे संचालक ईश्वर नाईक, रावसाहेब पडदाळे, जी. के. सावंत, तायगोंडा देसाई, रोशन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




त्यानंतर सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार संस्थेचे संस्थापक सदस्य बी.जी काटे व बी.एस. सावंत तसेच संस्थेचे संचालक दिलावर वाटंगी, डॉ. महेश चौगुले, डॉ. मनोहर कोळसेकर, अनिल सावरे, सौ. अंजली पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करणेत आला. त्यानंतर सेवानिवृत्त सभासद डॉ.एन.बी. जाधव, राजेंद्र खोराटे, एस.आर. काळे, एस. ए. चौगुले, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सेक्रेटरी बाळासाहेब शिंदे यांनी सभेसमोर नोटीस वाचन केले.




संस्थेचे चेअरमन संजय केसरकर यांनी प्रास्ताविक केले. त्यामधे त्यांनी संस्थेस रु.४२ लाख ६१ हजार ०२१ इतका नफा झाला असून अहवाल सालात सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेचे भागभांडवल १ कोटी ९७ लाख, निधी २ कोटी ७८ लाख, ठेवी ३४ कोटी २९ लाख, गुंतवणूक १७ कोटी २३ लाख, कर्जे २१ कोटी ८९ हजार, व खेळते भाग भांडवल ४१ कोटी २५ लाख २३ हजार असलेचे सांगितले.



सभेस संस्थेचे सभासद, हितचिंतक, ठेवीदार कर्मचारी वर्ग रविंद्र कोंडस्कर, नारायण होडगे उपस्थित होते. संचालक डॉ. महेश चौगुले यांनी आभार मानले. सुत्रसंचालन संस्थेचे माजी संचालक डी.बी. राऊत यांनी केले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.