महाविद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील पंधरा विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत तर दोघा विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली. महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा यावर्षीही कायम ठेवल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
गुणवत्ता यादीत मेकॅनिकल विभागात कुणाल सावंत (दुसरा), संकेत कोकितकर (चौथा), ओमकार पाटील( नववा ), इलेक्ट्रिकल विभागात विनायक पाटील (तिसरा), केदार कुंभार (पाचवा), सलमान मुल्लानी (सहावा), शामल पाटील (आठवी), सिव्हिलमध्ये रुचा रावण (सातवी), इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन अनुजा जाधव (दुसरी), सृष्टी कुलकर्णी (सहावी), संपत्ता गुळन्नावर (आठवी), कॉम्प्युटर सायन्स मध्ये पौर्णिमा कलसान्नावर (चौथी), अर्चना मगदूम (सातवी), अश्विनी मुतकेकर (आठवी), श्रेया खबाले (नववी) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तर रोशन काविलकर , ज्योत्स्ना हरमळकर-मोरबाळे यांचे शासनाच्या जलसंपदा विभागात सहाय्यक स्थापत्य अभियंता म्हणून निवड झाली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थाध्यक्ष ॲड आण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, ॲड बाळासाहेब चव्हाण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

